उन्हाळ्यात केस गळतीची मोठी समस्या असते. अशा वेळी याची करण आणि बचाव करण्याचे उपाय जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात केस जास्त तेलकट आणि घामट होतात. ज्यामुळे घाण तयार होते. पोषणाची कमतरता, डिहायड्रेशन आणि ऊन देखील केस गळतीचे कारण असू शकते.
Picture Credit: Pinterest
हलके आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करा. जो केस स्वच्छ ठेवेल. आठवड्यातून 2-3 वेळा केस धुतल्याने केस स्वच्छ राहतात आणि केसांची मूळ मजबूत राहतात. त्यामुळे केस गळती कमी होते.
Picture Credit: Pinterest
नारळ किंवा बदाम तेलाने आठवड्यातून दोन वेळा मसाज करा. यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते. केस मजबूत होऊन गळण्याचा त्रास हळूहळू कमी होऊ लागतो.
Picture Credit: Pinterest
प्रथिने, विटॅमीन आणि मिनरल्स असलेला आहार घ्या. हिरव्या भाज्या, फळ आणि बिया असलेल्या गोष्टी प्रथिने देतात. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळती थांबते.
Picture Credit: Pinterest
कडक उन्हात केस झाकून घ्या. स्कार्फ किंवा टोपीचा वापर करा. कारण uv किरण केसांना हानी पोहोचवू नये आणि केस चांगली राहतील.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्या. कारण शरीर आणि केस हाइड्रेटेड राहील. पाण्याच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात. त्यामुळे दिवसभरात 7-8 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.
Picture Credit: Pinterest