रात्री सतत पादताय, कसे थांबवाल?

Health

29 May, 2025

Editor: Dipali Naphade

रात्री झोपताना शरीराचे अवयव हे रिलॅक्स असतात आणि त्यामुळे गॅस पटकन बाहेर येतो. पण हे जास्त प्रमाणात होत असेल तर डॉक्टरकडे जायला हवे

पादणे

Picture Credit:  Pinterest

आपण जेवल्यावर पोटात गॅस तयार होतो जो तोंडातून ढेकराच्या स्वरूपात आणि छुंगणातून पादण्याच्या स्वरूपात बाहेर पडतो

पोटात गॅस

फळं, भाजी, डाळी आणि धान्य जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस जास्त तयार होतो. पण हे पदार्थ हेल्दीही असतात, त्यामुळे सोडू नयेत

फायबर

कोल्डड्रिंक्स, बिअर, फेसाळ पेयं आणि स्ट्रॉमधून पिण्याने पोटात गॅस तयार होऊ लागतो आणि पादायला होते

काय खाऊ नये

जेव्हा आपण झोपतो तेव्हा पचनक्रिया कमी हळूवार होते आणि गॅस एकत्र येऊन पादण्याची क्रिया होते. अनेकदा पादत आहोत हे कळतही नाही

पचनक्रिया

रात्री झोपताना जास्त पादत असाल तर तेलकट खाणे टाळा, लवकर जेवा आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स पिणे सोडा

लाइफस्टाइल

रोज नियमित व्यायाम आणि योग करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे पोटाशी संबंधित समस्या लवकर सुटतात

व्यायाम

तुम्ही रोज रात्री जास्त प्रमाणात पादत असाल तर मात्र याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते

त्रास

डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप