उन्हाळ्यात फक्त त्वचा टॅन होत नाही तर केस देखील रुक्ष होतात.
Picture Credit: istockphoto
वाढलेलं तापमान, घाम, धूळ आणि सूर्यप्रकाश यामुळे केस कोरडे, चिकट किंवा कमकुवत होऊ शकतात.
Picture Credit: istockphoto
केस स्वच्छ ठेवा उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने स्कॅल्पवर तेल आणि घाण साचते.
Picture Credit: istockphoto
याचमुळे अनेकजण महागड्या ट्रीटमेंटवर खर्च करतात.
Picture Credit: istockphoto
मात्र तुम्ही घरगुती सोप्या उपायांनी देखील केसांची काळजी घेऊ शकता.
Picture Credit: istockphoto
आठवड्यातून २–३ वेळा सौम्य शॅम्पूने केस धुवा. खूप गरम पाण्याने केस धुवू नका, त्यामुळे केस अधिक कोरडे होतात.
Picture Credit: istockphoto
नारळाचं किंवा बदामाचं तेल हलकं गरम करून स्कॅल्पला मसाज करा.
Picture Credit: istockphoto
यामुळे केसांना पोषण मिळतं आणि उष्णतेमुळे होणारा कोरडेपणा कमी होतो.
Picture Credit: istockphoto
तीव्र सूर्यप्रकाशामुळे केसांची नैसर्गिक चमक कमी होऊ शकते. बाहेर पडताना स्कार्फ, टोपी किंवा कॅप वापरा.
Picture Credit: istockphoto
शरीर हायड्रेट राहिलं तर केसांनाही फायदा होतो. उन्हाळ्यात पुरेसं पाणी, ताक, नारळपाणी आणि फळांचा ज्यूस घ्या.
Picture Credit: istockphoto