पावसाळ्यात उघड्यावरील अन्न, कच्च्या पालेभाज्या, शिळे अन्न, जंक फूड आणि दूषित पाणी पिणे कटाक्षाने टाळावे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
पालक, मेथी, कोबी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये किडे आणि माती असण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्या खाणे टाळावे.
Picture Credit: Pinterest
बाहेरचे कच्चे सॅलड, चिरलेली फळे किंवा स्प्राउट्स खाणे टाळावे, कारण त्यावर बॅक्टेरिया सहज वाढतात.
Picture Credit: Pinterest
पाणीपुरी, भजी, वडापाव किंवा उघड्यावर ठेवलेले तळकट पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार उद्भवू शकतात.
Picture Credit: Pinterest
पावसाळा हा अनेक माशांचा प्रजननाचा काळ असतो. या काळात दूषित पाण्यामुळे माशांमधून संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
फ्रिजमधील अतिथंड पाणी किंवा आइस्क्रीम खाल्ल्याने घशाचे आजार व सर्दी होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
पहिल्या पावसात भिजणे टाळावे कारण त्यात ॲसिड आणि हवेतील प्रदूषण असू शकते. तसेच सतत भिजल्याने त्वचेचे आजार होतात.
Picture Credit: Pinterest
ओले मोजे किंवा दमट कपडे जास्त वेळ वापरू नका, यामुळे फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) होऊ शकतो.