यंदा पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदान प्रक्रिया राबविली जात आहे.
Picture Credit: Pinterest
त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मतदान करावेच लागणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण २८ प्रभाग आहेत.
प्रभाग क्रमांक १ ते २७ मध्ये प्रत्येकी चार सदस्य (‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’) निवडले जातील.
प्रभाग १ ते २७ मधील प्रत्येक मतदाराला चार वेळा मतदान करणे आवश्यक आहे.
प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे एक मत द्यावचं लागणार.
एका जागेसाठी एकापेक्षा जास्त मते देता येणार नाहीत.
प्रत्येक उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर संबंधित लाल दिवा पेटेल.
चारही (किंवा तीन) जागांसाठी मतदान पू्र्ण झाल्यानंतर बीप असा आवाज येईल. तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजणार.