Published Sept 17, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
आपल्याकडे इतक्या प्रकारची फळ आहेत, की नाव घेता घेता आपण थकून जाऊ.
फळांचा राजा कोण याचं उत्तर तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे.
लहान असो वा मोठे सगळ्यांनाच आंबे आवडतात. त्यामुळे आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं.
.
उन्हाळा म्हटला की, सगळेजण आंबे खाण्याची वाट बघत असतात.
आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत, तसेच आंबा आरोग्यदायी आहे.
आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.
आंब्याची गोड गोड चव आणि मनाला मोहिनी घालणारा सुगंध सगळ्यांना हवाहवासा वाटतो.
फळांचा राजा हा आंबा आहे. पण तुम्हाला फळांची राणी माहीत आहे का?
मॅगोस्टीन फळाला फळांची राणी म्हटलं जातं
हे फळ प्रामुख्याने थायलॅंड, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये आढळतं
मॅंगोस्टीन हे फळं थायलॅंडचं राष्ट्रीय फळ आहे
मॅंगोस्टीन फळाचं वैज्ञानिक नाव गार्सीनिया मॅंगोस्टाना आहे