जीरा आलू हा फार कमी वेळेत तयार होणारा पदार्थ आहे

Life style

02 November, 2025

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या, सोलून मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा.

बटाटे कापा

Picture Credit: Pinterest

 एका कढईत तेल गरम करा आणि त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यावर हळद घाला.

फोडणी द्या

Picture Credit: Pinterest

आता त्यात उकडलेले बटाट्याचे तुकडे टाका आणि चांगले हलवा.

साहित्य मिक्स करा

Picture Credit: Pinterest

बटाट्यांवर लाल तिखट आणि मीठ शिंपडा. सर्व मसाले बटाट्यांवर नीट लागतील असे मिसळा.

मसाले टाका

Picture Credit: Pinterest

कढई झाकून 3-4 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या, मध्ये एकदा हलवा.

मंद आचेवर शिजू द्या

Picture Credit: Pinterest

 शिजल्यावर गॅस बंद करा आणि वरून चिरलेली कोथिंबीर आणि  लिंबाचा रस घाला.

कोथिंबीर आणि लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

 गरमागरम आलू जिरा पोळी, भात किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest