अपूर्ण झोपेमुळे आरोग्यावर कोणता परिणाम होतो?

Lifestyle

01 August, 2025

Author:  मयूर नवले

हल्ली अनेक जण धावपळीचे आयुष्य जगत आहेत.

धावपळीचे आयुष्य

Img Source: Pexels

या धावपळीच्या आयुष्यामुळे अनेक जण अपूर्ण झोप घेऊनच काम करत असतात.

अपूर्ण झोप

झोप कमी झाल्यास लक्ष केंद्रित करणे कठीण होते व कामातील चुकांची शक्यता वाढते.

एकाग्रतेचा अभाव

स्मरणशक्ती कमकुवत होते

झोपेच्या अभावाने लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते.

मानसिक आरोग्य बिघडते

अपुरी झोप नैराश्य, चिडचिड, चिंता यांसारख्या मानसिक समस्यांना कारणीभूत ठरते.

रोगप्रतिकारशक्ती कमी होते 

अर्धवट झोप घेतल्याने शरीरातील रोगांशी लढण्याची नैसर्गिक ताकद कमी होते.

वजन वाढते

अपुरी झोप भूक वाढवणारे हार्मोन्स वाढवते, ज्यामुळे वजन वाढते.

त्वचेचे आरोग्य बिघडते

डोळ्याखाली काळी वर्तुळे, फोड, कोरडी त्वचा यांसारख्या समस्या होतात.