SIPसाठी योग्य म्युच्युअल फंड निवडताना लक्षात घेण्याचे महत्त्वाचे मुद्दे...

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

फंडाने मागील ५-१० वर्षांत कशी कामगिरी केली आहे हे तपासा. बाजार चढ-उतार असतानाही जो स्थिर परतावा देतो, तो फंड चांगला मानला जातो.

ट्रॅक रेकॉर्ड पाहा

फंड मॅनेजरचा अनुभव, त्यांच्या निर्णयक्षमता आणि मागील फंड व्यवस्थापनाची कामगिरी महत्वाची असते. अनुभवी फंड मॅनेजर असलेल्या फंडला प्राधान्य द्या.

अनुभव 

expense ratio जितके कमी, तितका जास्त परतावा तुम्हाला मिळू शकतो. हे वार्षिक शुल्क असते जे फंड कंपनी तुमच्याकडून आकारते.

Expense Ratio

Value Research, Morningstar यांसारख्या वेबसाईट्सवर फंड रेटिंग तपासा. 4 किंवा 5 स्टार रेटिंग असलेले फंड अधिक विश्वसनीय मानले जातात.

रेटिंग तपासा

फंडमध्ये किती रक्कम गुंतवली गेली आहे हे बघा. जास्त AUM असलेले फंड स्थिर असतात.

AUM

SIP किती काळ चालवणार आहात यानुसार फंड निवडा. काही फंड लवकर पैसे काढल्यास Exit Load आकारतात.

Exit Load

Large Cap, Mid Cap, Small Cap, Hybrid, Debt असे वेगवेगळ्या प्रकारचे फंड असतात. Large Cap फंड तुलनेने सुरक्षित असतात, तर Small Cap मध्ये जोखीम जास्त असते पण परतावाही अधिक मिळू शकतो.

फंड कॅटेगरी 

फंडाने केवळ एका वर्षात चांगली कामगिरी केली आहे की सातत्याने अनेक वर्षे स्थिर परतावा दिला आहे हे तपासणे गरजेचे आहे.

Consistency तपासा

ELSS फंडमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 80C अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळू शकते. Long Term Capital Gains (LTCG) आणि Short Term Capital Gains (STCG) या कर नियमांची माहिती असावी.

Taxation समजून घ्या

Direct Plan मध्ये expense ratio कमी असते आणि परतावा जास्त मिळतो. जर तुम्हाला सल्लागाराची गरज नसेल तर Direct Plan अधिक फायदेशीर असतो. 

Direct Plan vs Regular प्लॅन