Published Nov 6, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
कारागृहात सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. यापैकी काही उपाय इतके विचित्र आहेत की वाचून आश्चर्य वाटेल.
काही देशांमध्ये कारागृहांच्या सुरक्षेसाठी बदकांचा वापर केला जातो.
तुरुंगाच्या सुरक्षेसाठी बदके कशी मदत करू शकतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?
बदके हे पाण्यात राहणारे प्राणी आहेत. ते पाण्यातील कोणत्याही प्रकारची क्रिया सहजपणे जाणू शकतात.
जर कोणी कारागृहात जाण्याचा प्रयत्न केला आणि तो व्यक्ति पाण्यातून गेला तर बदके लगेच त्याची माहिती देतात.
कोणी अनोळखी व्यक्ती आल्यास बदके लगेच आवाज करू लागतात, ज्यामुळे तुरुंगात उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना धोक्याची माहिती मिळते.
बदके जरी गोंडस दिसत असली तरी ती अनेक प्राण्यांसाठी धोकादायक असतात.
बदकांचा वावर असल्याने वन्य प्राणी कारागृहाजवळ येत नाहीत.
नेदरलँड्समधील अनेक तुरुंगांमध्ये सुरक्षेसाठी बदकांचा वापर केला जातो.
येथे बदके कारागृहाच्या सभोवतालच्या पाण्यात पोहत असतात आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवतात.
अमेरिकेतही काही तुरुंगांमध्ये बदकांचा वापर सुरक्षा रक्षक म्हणून केला जातो.
युरोपातील इतर अनेक देशांमध्ये कारागृहांच्या सुरक्षेसाठी बदकांचाही वापर केला जातो.