www.navarashtra.com

Published Nov 4,  2024

By  Harshada Jadhav

कांदा कापताना डोळ्यातून अश्रू का येतात? जाणून घ्या विज्ञान काय सांगते

Pic Credit -  pinterest

जगभरातील स्वयंपाकघरात दररोज विविध प्रकारच्या भाज्या कापल्या जातात. यामध्ये कांद्याचाही समावेश आहे.

कांदा

कांद्याचा वापर प्रामुख्याने भाज्या, पकोडे, सलाड इत्यादी बनवण्यासाठी केला जातो.

वापर

आपण कांदा कापतो तेव्हा आपल्या डोळ्यांत पाणी येते, हा कांद्याचा गुणधर्म आहे. 

गुणधर्म 

कांदा कापताना डोळ्यांत पाणी तर येतच, पण त्यामुळे डोळ्यांना तीव्र जळजळ आणि खाज सुटू लागते. 

डोळ्यांवर परिणाम

यामागाचं कारण तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया

कारण

कांद्यामध्ये सायन-प्रोपॅनिथियल-एस-ऑक्साइड नावाचे रसायन असते. या रसायनामुळे डोळ्यांत पाणी येते.

जाणून घ्या

डोळ्यांच्या अश्रु ग्रंथींवर रसायनचा परिणाम होतो त्यामुळे डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात.

रसायन

कांदा कापताना डोळ्यांत पाणी येण्याचे दुसरं कारण म्हणजे लॅक्रिमेटरी फॅक्टर सिंथेस एन्झाइम. 

दुसरं कारण

आपण कांदा कापतो किंवा सोलतो तेव्हा त्यात असलेले लॅक्रिमेटरी-फॅक्टर सिंथेस एन्झाइम हवेत मिसळते.

हवा

एन्झाइम सल्फेनिक ऍसिडमध्ये रूपांतरित होत. त्यामुळे डोळ्यांच्या अश्रू ग्रंथीवर परिणाम होऊन डोळ्यात जळजळ आणि अश्रू येऊ लागतात.

अश्रू ग्रंथीवर परिणाम 

कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई आणि सोडियम, पोटॅशियम, लोह आणि आहारातील फायबर यांसारखे पोषक घटक असतात.

पोषक घटक