Published Nov 11, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
कोणत्याही गुन्ह्यात दोषी आढळलेल्या व्यक्तीला तुरुंगात टाकले जाते.
जर एखादा आरोपी तुरुंगातून पळून गेला तर हा गुन्हा मानला जातो.
परंतु तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का जिथे तुरुंगातून पळून जाणे गुन्हा नाही.
जगात असा एक देश आहे जिथे कैदी तुरुंगातून पळून गेला तर तो गुन्हा मानला जात नाही.
तुरुंगातून पळून जाणे हा जर्मनीमध्ये गुन्हा मानला जात नाही. यामागे एक विशेष कारण आहे.
मुक्त होणे हा माणसाचा अधिकार आहे, असं जर्मनीमधील लोकं मानतात. त्यांच्या याच विचारामुळे येथे तुरुंगातून पळून जाणे हा गुन्हा मानला जात नाही.
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने आपल्या न्याय व्यवस्थेत अनेक बदल केले.
मानवी हक्क आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या संरक्षणाला येथील कायद्यात प्राधान्य दिले गेले.
जर्मनीत मानले जाते की तुरुंगातून पळणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, जेव्हा एखादी व्यक्ती समस्यांना तोंड देते तेव्हा ती नक्कीच पळून जाते.
जर्मवनीत एखाद्या व्यक्तीला तुरुंगात राहण्याची परिस्थिती योग्य वाटत नसेल तर त्याला पळून जाण्याचा अधिकार आहे.
तुरुंग हे केवळ शिक्षा नसून ते सुधारण्याचे ठिकाण असावे, असाही विचार जर्मनीमध्ये प्रचलित आहे.