www.navarashtra.com

Published Nov 10,  2024

By  Harshada Jadhav

या देशांत रिप्ड जीन्स घालण्यास मनाई 

Pic Credit -  pinterest

बदलत्या फॅशनमध्ये, काही वर्षांपासून रिप्ड जीन्स तरुणांची पसंती राहिली आहे.

रिप्ड जीन्स

परंतु आज अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे रिप्ड जीन्स घातल्यास शिक्षा होऊ शकते.

शिक्षा 

काही देशांमध्ये विशिष्ट प्रकारच्या कपड्यांवर बंदी आणि शिक्षेची तरतूद आहे.

विशिष्ट कपडे

गेल्या काही वर्षात अनेक देशांनी रिप्ड जीन्स घालण्याबाबत कडक कायदे केले आहेत.

कडक कायदे

इराणमध्ये फॅशन आणि कपड्यांबाबत कडक नियम आहेत. तिथे रिप्ड जीन्स घालणे अनैतिक मानले जाते.

इराण

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी असे कपडे परिधान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे तेथील सरकारचे आदेश आहेत.

सरकारचे आदेश 

सौदी अरेबियामध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्याची परवानगी नाही.

सौदी अरेबिया

जेव्हा एखादी महिला रिप्ड जीन्स घालते तेव्हा तिला शिक्षा केली जाऊ शकते. अशा प्रकारचे कपडे अशोभनीय मानले जातात.

अशोभनीय 

अफगाणिस्तानमध्ये कपड्यांबाबत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. येथे महिलांसाठी रिप्ड जीन्स घालण्यास मनाई आहे.

अफगाणिस्तान

जर एखाद्या महिलेने रिप्ड जीन्स घातली तर तिला अटक किंवा आर्थिक दंडाची शिक्षा दिली जाऊ शकते.

आर्थिक दंड

पाकिस्तानमध्ये रिप्ड जीन्स सारख्या कपड्यांविरोधात काही धार्मिक गटांनी निदर्शनेही केली आहेत.

पाकिस्तान

उत्तर कोरियामध्ये रिप्ड जीन्स घालण्यासाठी कठोर शिक्षा दिली जाते.

उत्तर कोरिया