Published Dec 8, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
बालविवाहची प्रथा रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे.
भारतात अजूनही एक अशी जागा आहे जिथे मुलींच्या लहानपणीच लग्न ठरवलं जातं.
मुलगी मोठी झाल्यानंतर तिला या बंधनातून मुक्त व्हायचे असेल तर तिला त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात.
राजगड हा मध्य प्रदेशातील एक जिल्हा आहे, जिथे परंपरा आणि चालीरीतींचा खोलवर प्रभाव आहे.
बालविवाहाची प्रथा आजही येथे प्रचलित आहे.
या परंपरेनुसार, अनेक वेळा मुलगा आणि मुलीचे लग्न त्यांच्या बालपणातच निश्चित केले जाते.
हे विवाह बहुधा समाजाच्या पारंपारिक समजुती आणि कुटुंबांमधील करारांवर आधारित असतात.
बालविवाहाची ही प्रथा या भागात अनेक दशकांपासून सुरू आहे.
समाजाच्या नियमानुसार पालक आपल्या मुलांचे बालवयातच लग्न लावून देतात.
राजगडमध्ये सुरू असलेल्या या परंपरेचे नाव आहे ढागरा नत्र.
राजगड व्यतिरिक्त आगर माळवा , गुना, झालावाड ते राजस्थानच्या चित्तोडगड या ठिकाणी ही परंपरा पाळली जाते.
समाजात मान-सन्मान टिकून राहावा म्हणून हा दंड आकारला जातो.
लग्न मोडल्यास नुकसान भरपाईची रक्कम दोन्ही कुटुंबांना द्यावी लागते.