Published Dec 7, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे.
वधू-वरांना लग्नानंतर मॅरिज सर्टिफिकेट तयार करावं लागतं.
पण तुम्हाला माहिती आहे का मॅरिज सर्टिफिकेट महत्त्वाचं का आहे?
मॅरिज सर्टिफिकेटला विवाह प्रमाण पत्र असं देखील म्हटलं जातं.
हा एक महत्त्वाचा कायदेशीर डॉक्युमेंट आहे जो विवाहाला अधिकृतपणे मान्यता देतो.
मॅरिज सर्टिफिकेट दोन व्यक्ती कायदेशीररित्या विवाहित आहेत आणि त्यांचे लग्न वैध असल्याचा पुरावा म्हणून काम करते.
डॉक्युमेंट केवळ भारतीय कायद्यानुसार महत्त्वाचा नाही, तर अनेक वैयक्तिक आणि कायदेशीर बाबींमध्येही आवश्यक आहे.
मॅरिज सर्टिफिकेट सरकारी अधिकाऱ्याद्वारे जारी केले जाते.
मॅरिज सर्टिफिकेट न्यायालयात किंवा मंदिर, चर्च, मस्जिद इत्यादी ठिकाणी होणाऱ्या विवाहाला प्रमाणित करते.
हे डॉक्युमेंट विवाहासंबंधी कोणत्याही कायदेशीर विवादाच्या बाबतीत उपयुक्त ठरू शकतो.
मालमत्ता, पैसा आणि इतर कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मॅरिज सर्टिफिकेट वापरलं जाऊ शकतं.
जोडीदाराचा मृत्यू झाल्यास, मॅरिज सर्टिफिकेट हे पुरावे प्रदान करते की दोघेही कायदेशीररित्या विवाहित होते.
पासपोर्ट किंवा व्हिसासाठी अर्ज करणे किंवा मुलांचे जन्म प्रमाणपत्र मिळवणे किंवा लग्नाच्या नावाने सरकारी योजनांचा लाभ घेणे