Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
लग्नानंतर घटस्फोट ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एकत्र राहणारे पती-पत्नी पूर्णपणे वेगळे होतात.
मात्र, जगात असा एक देश आहे जिथे पती-पत्नी इच्छा असूनही घटस्फोट घेऊ शकत नाहीत.
आपण फिलीपिन्सबद्दल बोलत आहोत.
व्हॅटिकन सिटीनंतर, हा जगातील एकमेव देश आहे जिथे घटस्फोटाला कायदेशीर मान्यता नाही.
याचा अर्थ असा की पती-पत्नीमधील संबंध कितीही वाईट झाले तरी त्यांना घटस्फोट मिळू शकत नाही.
फिलीपिन्समध्ये घटस्फोटाला कायदेशीर मान्यता न देण्यामागे एक धार्मिक व्यवस्था आहे.
येथे कॅथोलिक धर्माचे पालन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
या धर्मात लग्नाला एक पवित्र बंधन मानले जाते, ज्यामध्ये घटस्फोटाची तरतूद नाही.