घरामध्ये केळीचे रोप कोणत्या दिशेला लावावे, जाणून घ्या

Life style

27 November, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मामध्ये काही रोपांना विशेष महत्त्व आहे. यामध्ये केळ्याच्या रोपाचा समावेश आहे. केळ्याच्या रोपामध्ये विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वास असतो.

केळ्याच्या रोपाची पूजा

केळ्याचे रोप लावण्याची योग्य दिशा जाणून घ्या त्यामुळे जीवनामध्ये आनंद येईल. कोणत्या दिशेला केळीचे रोप लावावे

केळ्याचे रोप लावण्याची दिशा

उत्तर पूर्व दिशा

केळ्याचे रोप उत्तर पूर्व दिशेला लावावे. असे करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या जीवनात आनंद येतो आणि दिवसरात्र प्रगती होते

सकारात्मक ऊर्जा

व्यक्तीची दिवसरात्र प्रगती होण्यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होते. कुटुंबावर येणाऱ्या समस्या दूर होतात

दक्षिण दिशा

केळ्याचे रोप कधीही दक्षिण, पश्चिम आणि आग्नेय दिशेला लावू नये. यामुळे तुमच्या कुटुंबावर काही ना काही समस्या येऊ शकते. आर्थिक समस्या येऊ शकतात.

कधी लावावे रोप

जर तुम्हाला केळ्याचे रोप लावायचे असेल तर त्यासाठी गुरुवार आणि पौर्णिमेचा दिवस शुभ मानला जातो. याव्यतिरिक्त इतर दिवशी केळ्याचे रोप लावू नये

रोपाला पाणी द्या

केळ्याच्या रोपामध्ये काटेदार रोप लावू नये. याव्यतिरिक्त केळ्याच्या रोपाला रोज पाणी द्या. तसेच केळ्याच्या रोपाजवळ स्वच्छता ठेवा

आर्थिक समस्या

आर्थिक समस्येतून सुटका होण्यासाठी गुरुवारी केळ्याच्या रोपाला पाणी अर्पण करावे केळीच्या झाडाचे मूळ घ्या, ते गंगाजलाने शुद्ध करा आणि या तिजोरीत ठेवा.