बऱ्याचदा लोक चुकीच्या ठिकाणी झाडू ठेवतात. झाडू कुठे ठेवल्याने धनप्राप्ती होते, जाणून घ्या
Picture Credit: Pinterest, istock
घरात कोणत्याही वस्तू ठेवताना वास्तूच्या नियमांकडे लक्ष दिले पाहिजे. या नियमांचे पालन न केल्यास वास्तू दोष होऊ शकतो.
घरात अशी जागा असते तिथे झाडू ठेवणे शुभ मानले जाते. योग्य दिशेला न ठेवल्यास घरात दारिद्र्य येऊ शकते.
घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला झाडू ठेवणे शुभ मानले जाते. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही.
झाडू खाली ठेवू नये. तसेच उभा करुन देखील ठेवू नये. असे केल्यास घरात गरिबी येऊ शकते.
आर्थिक अडचणींचा सामना करत असल्यास दक्षिण आणि पश्चिम दिशेला झाडू ठेवावा. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
नवीन झाडू खरेदी करण्यासाठी अमावस्या, मंगळवार, शनिवार आणि रविवार हे दिवस खूप शुभ मानले जाते. या दिवशी झाडू खरेदी केल्याने प्रगती होते
वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात झाडू ठेवणे निषिद्ध मानले जाते. या दिशेला झाडू ठेवल्यास देवी लक्ष्मी नाराज होते