पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायला हवी. यावेळी तुम्हाला आजारपणांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आहारात या ज्युसचा समावेश करा
पावसाळ्यात आजारपणापासून वाचण्यासाठी व्हिटॅमीन सी असलेले संत्र्याचा रसाचा आहारामध्ये समाविष्ट करा. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी आहारात आले आणि लिंबाचा रस याचा समावेश करावा. यामध्ये इंफ्लेमेटरी आणि बॅक्टेरियल गुण आहेत ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए ने समृद्ध गाजराचा रस डोळ्यांसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे.
डाळिंब्याचा रसामध्ये अॅण्टीऑक्सीडेंट आणि पॉलीफेनॉल हे मोठ्या प्रमाणात असते. जे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्सने समृद्ध असलेल्या पपईच्या रसाचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा. ते शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
टोमॅटोचा रस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी मदत करते. यामध्ये व्हिटॅमीन सी असते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी लिंबू आणि मध असलेला ज्यूस प्या. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.