Published August 14, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/Instagram
15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन असून अनेक जण गाडीवर यादिवशी झेंडा लावतात
मात्र आपल्या देशातील काही व्यक्तींनाच झेंडा गाडीवर लावण्याची परवानगी आहे
.
भारतीय झेंडा संहिता, 2002 अनुसार, विशेष व्यक्तींनाच गाडीवर झेंडा लावण्याचा हक्क आहे
देशाचे राष्ट्रपती आपल्या गाडीवर झेंडा लाऊ शकतात
उपराष्ट्रपतींनादेखील गाडीवर झेंडा लावण्याचा अधिकार आहे
राज्यपालांसह उपराज्यपालदेखील गाडीवर झेंडा लावण्याचा हक्क बजावू शकतात
याशिवाय भारतीय झेंडा पंतप्रधान आणि अन्य केबिनेट मंत्रीही गाडीवर लाऊ शकतात
देशाच्या प्रमुख व्यक्तींपैकी असणारे लोकसभा अध्यक्ष आणि मुख्य न्यायाधिशांनाही झेंडा गाडीवर लावण्याचा हक्क आहे
या यादीमध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील समाविष्ट असून झेंडा गाडीवर लावण्यासाठी हक्कदार आहेत