स्वातंत्र्यदिनाच्या सजावटीमध्ये रांगोळीचे स्थान अद्वितीय आहे. शाळेच्या मंचासमोर, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर किंवा महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या ठिकाणी या सुंदर रांगोळीच्या डिझाइन्स काढता येऊ शकता.
Picture Credit: Pinterest
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि कमळ हे राष्ट्रीय फूल आहे. त्यामुळे, स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळीमध्ये या दोन्ही गोष्टींचा समावेश करणे ही एक सुंदर कल्पना ठरू शकते.
Picture Credit: Pinterest
चमच्याचा वापर करून झटपट रांगोळी काढा. जमिनीवर थोडासा रंग ठेवून चमच्याच्या मागील बाजूने तो पसरवल्यास पाकळ्यांसारखे आकार तयार करता येतात. असे अनेक आकार गोलाकार पद्धतीने मांडा आणि मध्यभागी छोटेसे अशोक चक्र किंवा तिरंगा काढा. अशा प्रकारे, अगदी कमी कष्टात तुमची रांगोळी तयार होईल.
Picture Credit: Pinterest
झटपट होणारी अशी तिरंगी आणि फुलांच्या नक्षीची रांगोळी. तुम्ही मध्यभागी अशोक चक्र काढून त्याच्या भोवती फुलांची नक्षी काढू शकता. यात केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांचा समतोल वापर केल्यास ती अधिक आकर्षक दिसेल. ही डिझाइन विशेषतः कार्यालयांच्या प्रवेशद्वारांसाठी किंवा शाळांमधील लहान जागांसाठी अतिशय योग्य आहे.
Picture Credit: Pinterest
तिरंग्याची एक मोठी आणि साधी रांगोळी काढता येईल. सर्वप्रथम संपूर्ण डिझाइनची बाह्यरेषा काढा आणि त्यानंतर केशरी, पांढरा व हिरवा रंग भरण्यासाठी तीन विभाग निश्चित करा. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र काढायला विसरू नका. सुबक बाह्यरेषेमुळे या डिझाइनचे सौंदर्य अधिकच खुलून दिसेल.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
तुम्ही गोलाकार किंवा आयताकृती सीमेच्या आत आडवे किंवा उभे असे तीन रंगांचे पट्टे काढू शकता आणि मध्यभागी अशोक चक्र रेखाटू शकता. कडांवर लहान फुले किंवा दिव्यांच्या आकाराचे नक्षीकाम करून ही रांगोळी अधिक आकर्षक बनवता येईल. ड एक बाहेरच्या दिशेने काढा.
Picture Credit: Pinterest
सर्वप्रथम खडूच्या साहाय्याने डोके, शरीर आणि हातांचे आकार रेखाटून सुरुवात करा. त्यानंतर, त्यातील कपडे आणि तिरंग्यामध्ये योग्य रंग भरा. अगदी मर्यादित रंगांचा वापर करूनही ही रांगोळी अत्यंत आकर्षक दिसू शकते.