www.navarashtra.com

Published  Nov 18, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शुभारंभ सुरु होणार आहे. बीसीसीआयने १८ खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी केली आहे.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे.

सचिन तेंडुलकर

भारताचे पाहुणे कोच व्हीव्हीएस लक्ष्मण या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी २९ सामन्यांमध्ये २४३४ धावा केल्या आहेत.

व्हीव्हीएस लक्ष्मण

भारताचे माजी कोच राहुल द्रविडचा या यादीत तिसरा क्रमांक आहे, त्यांनी २१४३ धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध केल्या आहेत.

राहुल द्रविड

.

भारताचा सलामीवीर फलंदाज चेतेश्वर पुजाराने २५ सामन्यांमध्ये २०७५ धावा केल्या आहेत, तो या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

चेतेश्वर पुजारा

.

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीचा नंबर पाचवा आहे त्याने आतापर्यत २५ सामन्यांमध्ये २०४५ धावा केल्या आहेत.

विराट कोहली

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग या यादीमध्ये सहाव्या स्थानावर आहे, त्याने २२ सामन्यांमध्ये १७३८ धावा केल्या आहेत.

वीरेंद्र सेहवाग

भारताचा दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर या यादीमध्ये सातव्या स्थानावर आहे. त्यांनी २० सामन्यांमध्ये १५५० धावा केल्या.

सुनील गावस्कर

टीम इंडियाचा फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८ सामन्यांमध्ये १५३८ धावा केल्या आहेत.

गुंडप्पा विश्वनाथ

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली या यादीमध्ये नवव्या स्थानावर आहेत, त्यांनी २४ कसोटी सामन्यात १४०३ धावा केल्या आहेत.

सौरभ गांगुली

भारताचा फलंदाज मुरली विजय या यादीमध्ये दहाव्या स्थानावर आहे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५ सामन्यांमध्ये १३२४ धावा केल्या आहेत.

मुरली विजय