Published Oct 18, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेडवर भारतीय संघाने केवळ 36 धावा केल्या होत्या. या मालिकेत पुनरागमन करत मालिका जिंकली होती.
1974 मध्ये लॉड्सवर इंग्लडविरुद्ध भारताच्या फलंदाजांना केवळ 42 धावा करत्या आल्या.
17 ऑक्टोबर 2024 ला बंगळूरुमध्ये भारतीय संघाच्या प्रबळ फलंदाजीचा कारभार न्युझीलंडने केवळ 46 धावात आटपला. ही भारताची मायदेशातील सर्वात कमी धावसंख्या आहे.
1947 साली भारतीय संघाला ब्रिसबेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना केवळ 58 धावा करता आल्या.
1952 मध्ये मॅंचेस्टर येथे झालेल्या सामन्यात इंग्लडने भारतीय संघाला 58 धावांवर रोखले होते.
1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेने डरबन येथील सामन्यात भारतीय संघाला केवळ 66 धावांमध्ये रोखले होते.
1948 मध्ये मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 67 धावा करता आल्या.
1987 साली प्रबळ वेस्टइंडिजच्या गोलंदाजीसमोर भारताला केवळ 75 धावा करता आल्या होत्या.