Published August 10, 2024
By Preeti Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास स्टाईलची सर्वत्र चर्चा असते. कुर्ता आणि जॅकेट असा मोदींचा लूक लोकप्रिय आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसून येतात.पांढरा शर्ट – पॅंट आणि लाल टिळा, दाढी अशी खास स्टाईल आहे.
.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटची सर्वत्र चर्चा आहे. त्यांनी स्टाईल केलेले पैठणी जॅकेट पसंतीस उतरले आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेपासून आपली स्टाईल बदलली आहे. पांढरा टी शर्ट आणि पांढरी दाढी असा लूक राहुल गांधीचा विशेष ठरतो आहे.
निर्मला सीतारमण यांची साड्यांची हटके स्टाईल आहे. खादी कॉटनच्या त्यांच्या साड्या भारतीय परंपरेचे द्योतक देखील आहेत
UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा लूक देखील अनोखा आहे. राजकारणात वेगळे असलेले योगी नेहमी साधूंसारख्या वेशभूषेमध्ये असतात.
सध्या चिराग पासवान हे नाव राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहे. हातात गंडे आणि कपाळी टीळा असा चिराग यांचा लूक तरुणांना आकर्षित करतो आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे नेहमी त्यांच्या लाल टोपीमध्ये दिसून येतात. ही टोपी त्यांचे वेगळेपण दाखवून देते.