TVS Motorने आपली Adventure बाईक Apache RTX 300 युरोपियन बाजारात नेली आहे. इटलीमध्ये या बाईकची विक्री नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
Picture Credit:pinterest
इटलीमध्ये Apache RTX 300 ची किंमत €4,890 ते €5,290 ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम साधारण ₹5.43 लाख ते ₹5.88 लाख इतकी होते.
Picture Credit:pinterest
Apache RTX 300 भारतात तुलनेने खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख आहे. त्यामुळे भारत आणि इटलीतील किंमतीत मोठा फरक दिसतो.
Picture Credit:pinterest
Apache RTX 300 मध्ये 299.1cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 36 PS पॉवर आणि 28.5 Nm टॉर्क तयार करते. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
Picture Credit:pinterest
या Adventure बाइकला Adaptive Headlight, TFT Instrument Cluster, Google Maps Mirroring, Cruise Control आणि Bi-Directional Quick-Shifterसारखी प्रीमियम फीचर्स मिळतात.
Picture Credit:pinterest
Apache RTX 300 मध्ये पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना Adjustable Suspension देण्यात आले आहे. यासोबत Traction Control आणि विविध Riding Modesही मिळतात.
Picture Credit:pinterest
बाईकमध्ये 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर Alloy Wheels आहेत. Tubeless Tyres, Knuckle Guards, Windshield आणि Rear Luggage Rackमुळे Touringसाठी तिचा सेटअप अधिक उपयोगी बनतो.
इटलीमध्ये Apache RTX 300 ची विक्री नोव्हेंबरपासून सुमारे 150 आउटलेट्समध्ये सुरू होणार आहे. TVSच्या डीलरशिपसोबत काही Multi-Brand Showroomsमधूनही बाइक उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Apache RTX 300 ही TVSच्या Global Product Strategyचा भाग आहे. Adventure Styling, दमदार Performance आणि भरपूर टेक्नॉलॉजीच्या जोरावर कंपनी इटलीतील Premium Adventure Bike ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
Picture Credit:pinterest