Versys 1100 की Z900? 3.8 लाखांचा फरक, कोणती बाईक आहे जबरदस्त?

Automobile

11 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

एकीकडे लांब पल्ल्याच्या Touring साठी तयार झालेली Versys 1100, तर दुसरीकडे स्पोर्टी रोड राइडिंगसाठी ओळखली जाणारी Z900. मग तुमच्यासाठी कोणती बाईक योग्य?

Kawasakiच्या दोन जबरदस्त Bikes आमनेसामने!

Picture Credit:pinterest

Versys 1100 मध्ये 1099cc, 4-सिलिंडर इंजिन मिळतं. Z900 मध्ये 948cc, 4-सिलिंडर इंजिन आहे. म्हणजे Engine Capacity मध्ये Versys स्पष्टपणे पुढे आहे.

इंजिनमध्ये कोण पुढे?

Picture Credit:pinterest

Versys 1100 135 PS आणि 112 Nm पॉवर-टॉर्क देते. Z900 मध्ये 125 PS आणि 98.6 Nm मिळतात. त्यामुळे कागदावर Versys 1100 अधिक दमदार आहे.

Versysची ताकद जास्त!

Picture Credit:pinterest

Versys 1100 चे वजन 257kg आहे, तर Z900 चे वजन 212kg आहे. त्यामुळे शहरातील किंवा वळणावळणाच्या रस्त्यांवरील हाताळणीत Z900 अधिक हलकी वाटू शकते.

हलकी बाईक हवी? Z900!

Picture Credit:pinterest

Versys 1100 मध्ये 21 लिटरचा फ्यूल टँक आहे. Z900 मध्ये 17 लिटरची क्षमता मिळते. त्यामुळे Touringच्या दृष्टीने Versys 1100 अधिक योग्य ठरते.

लांब प्रवासासाठी Versysचा फायदा

Picture Credit:pinterest

Versys 1100 ची ARAI-claimed mileage 17.85 kmpl आहे. Z900 ची mileage 20.83 kmpl इतकी दिली आहे. त्यामुळे इंधन कार्यक्षमतेत Z900 वरचढ आहे.

Mileageमध्ये कोण पुढे?

Picture Credit:pinterest

Versys 1100 मध्ये Power Modes,Traction Control, IMU-based Cornering Management आणि Cruise Control यांसारखी फीचर्स आहेत. लांब राइडमध्ये ही इलेक्ट्रॉनिक्स मदत करू शकतात.

Featuresमध्ये Touringचा फोकस

BikeDekhoवरील उपलब्ध माहितीनुसार 2025 Versys 1100 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 13.79 लाख आहे, तर Z900 ची किंमत सुमारे 9.99 लाख आहे. म्हणजेच दोन्हींमध्ये जवळपास 3.8 लाखांचा फरक आहे.

किंमतीतही मोठा फरक

लांब Touring, मोठा Fuel Tank आणि जास्त Power हवी असेल तर Versys 1100 आकर्षक पर्याय आहे. पण कमी वजन, स्पोर्टी Riding आणि तुलनेने कमी बजेट महत्त्वाचं असेल तर Z900 अधिक योग्य ठरू शकते.

मग कोणती बाईक घ्यावी?

Picture Credit:pinterest