EV बॅटरी वापरून झाल्यानंतर ती टाकून देण्याऐवजी रिसायकल करता येते. या प्रक्रियेतून महागडे धातू पुन्हा मिळवले जातात.
Picture Credit: Nissan
Black Mass म्हणजे रिसायकलिंगदरम्यान तयार होणारी काळसर पावडर. यात लिथियम, निकेल, कोबाल्ट, मँगनीज आणि ग्रेफाइटसारखे घटक असतात.
Picture Credit: Pinterest
सर्वप्रथम जुन्या बॅटरीची तपासणी केली जाते. त्यानंतर ती सुरक्षितपणे डिस्चार्ज करून वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळी केली जाते.
Picture Credit: Nissan
बॅटरीचे सेल विशेष मशीनमध्ये बारीक केले जातात. या प्रक्रियेतून धातू आणि इतर घटकांचे मिश्रण तयार होते.
Picture Credit: Pinterest
विशेष यंत्रांच्या मदतीने प्लास्टिक, लोखंड, तांबे आणि अॅल्युमिनियम वेगळे केले जातात. उरलेल्या काळसर पावडरला Black Mass म्हणतात.
Picture Credit: Nissan
Black Mass मधून धातू वेगळे करण्यासाठी Hydrometallurgy पद्धत वापरली जाते. यामध्ये रासायनिक द्रावणांच्या मदतीने लिथियम, निकेल आणि कोबाल्टसारखे धातू मिळवले जातात.
Picture Credit: Pinterest
या पद्धतीत उच्च तापमानावर Black Mass किंवा बॅटरीतील घटक वितळवले जातात. त्यातून कोबाल्ट, निकेल आणि तांब्यासारखे धातू मिळवता येतात.
Picture Credit: Nissan
10 नोव्हेंबर 2026 रोजी DGFT ने लिथियम-आयन बॅटरी Black Mass च्या निर्यातीवर बंदी घातली. हा नियम तात्काळ लागू करण्यात आला आहे. आता देशात तयार होणाऱ्या Black Mass वर देशांतर्गत प्रक्रिया करण्याला प्राधान्य मिळणार.
या निर्णयामुळे भारतातील रिसायकलिंग उद्योगाला कच्चा माल मिळण्यास मदत होईल. लिथियम, कोबाल्ट आणि निकेलची देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासह आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आहे.