स्वत:च तयार करत आहेत आपला रिप्लेसमेंट!

India

17 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

स्वत:चीच नोकरी धोक्यात

अहवालानुसार, भारतीय वर्कर्स त्यांच्या डोक्यावर, हातांवर आणि पायांवर सेन्सर्स लावत आहेत. ज्यामुळे यंत्रांना त्यांची दैनंदिन कामे शिकता येत आहेत. चला, याबद्दल जाणून घेऊया.

Picture Credit:  istockphoto

प्रशिक्षण देणे

भारतीय वर्कर्स रोजची कामे कॅमेरे, सेन्सर्सच्या मदतीने रेकॉर्डिंग करतात. जेणेकरुन कृत्रिम बुद्धिमता असलेल्या रोबोट्सना प्रशिक्षणासाठी डेटा मिळेल.

Picture Credit:  istockphoto

फर्स्ट पर्सनल डेटा

रोबोटना प्रशिक्षण देण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा. हे करण्यासाठी, लोक त्यांच्या डोक्यावर कॅमेरे लावून त्यांच्या कृती रेकॉर्ड करतात.

Picture Credit:  istockphoto

हे काम त्यांच्या नियमित नोकरीपेक्षा जास्त कमाईचे ठरत आहे. अहवालानुसार, काही जण रेकॉर्डिंगसाठी प्रति तास २५० रुपयांपर्यंत कमावतात. 

रेकॉर्डिंगमध्ये अधिक पैसे

Picture Credit:  istockphoto

ह्यूमनॉइड रोबोट्सची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, २०५० पर्यंत जगभरात १ अब्जाहून अधिक रोबोट्स वापरात असू शकतील.

जागतिक बाजारपेठ

Picture Credit:  istockphoto

काही कामगार घरीच आपल्या कामाचे रेकॉर्डिंग करतात. तर अनेकांना विशेष स्टुडिओमध्ये बसवून तेच काम वारंवार करण्यास भाग पाडले जाते.

स्टुडिओमध्ये होते रेकॉर्डिंग

Picture Credit:  istockphoto

कंपन्या केवळ व्हिडिओच नव्हे, तर इतर प्रकारचा डेटादेखील रेकॉर्ड करतात. कामगारांच्या हातांवर आणि पायांवर मोशन सेन्सर्स बसवले जातात.

व्हिडिओपेक्षा जास्त

Picture Credit:  istockphoto

हे तंत्रज्ञान नवीन रोजगार निर्माण करत आहे, परंतु अनेक तज्ञांच्या मते भविष्यात ते कामगार वर्गाच्या मोठ्या संख्येने नोकऱ्या संपुष्टात आणू शकतात. 

काम संपवू शकतो

Picture Credit:  istockphoto