इंजिन गरम करण्याची जुनी पद्धत आजही उपयुक्त आहे का?

Automobile

30 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

इंजिन गरम होण्यासाठी लागतो वेळ

बऱ्याचदा, जेव्हा तुम्ही तुमची गाडी सुरु करता, तेव्हा तुम्ही इंजिन गरम होण्यासाठी ती काही वेळ तशीच ठेवता.

Picture Credit: Pinterest

आधुनिक गाड्या

मात्र, आधुनिक गाड्या चालवण्यापूर्वी त्यांना जास्त गरम करण्याची गरज नसते.

Picture Credit: Pinterest

इंजिन १५-३० सेकंदांसाठी निष्क्रिय 

त्याचवेळी तापमान काहीही असले तरी इंजिन १५-३० सेकंदांसाठी निष्क्रिय ठेवणे पुरेसे आहे.

Picture Credit: Pinterest

इंजिनचे इष्टतम तापमान ९० ते १०० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. जे साध्य करण्यासाठी वाहन हळू चालवणे हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो.

तापमान ९० ते १०० अंश

Picture Credit: Pinterest

यासोबतच वाहनाच्या इंजिनलाच नव्हे तर गिअरबॉक्सलाही योग्य उष्णता आणि स्नेहन केवळ ते चालू असतानाच मिळते. 

गिअरबॉक्सलाही उष्णता मिळते

Picture Credit: Pinterest

त्याचबरोबर गाडी जास्त वेळ गरम करुन काही उपयोग होत नाही, त्यामुळे फक्त पेट्रोल आणि डिझेल वाया जाते. 

इंधन वाया जाते

\Picture Credit: Pinterest

तसेच, इंजिन जास्त वेळ बंद राहिल्यास, न जळलेले इंधन इंजिन ऑइलमध्ये मिसळते, ज्यामुळे ऑइलचा दर्जा खालावतो. 

ऑइलचा दर्जा खालावतो

\Picture Credit: Pinterest

याशिवाय, गाडी न चालवता गरम केल्याने वातावरणात कार्बन डायऑक्साइडसारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन वाढते.

कार्बन डायऑक्साइड

\Picture Credit: Pinterest

गाडी थांबलेली असताना शून्य अंतर कापले जाते, ज्यामुळे तुमच्या वाहनाचे मायलेज देखील कमी होते. 

मायलेज

\Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?