सुका मेव्यामध्ये प्रथिने, फायबर, त्यामध्ये आरोग्यदायी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, म्हणूनच ते पौष्टिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात सुका मेवा खावू शकता, मात्र मर्यादित प्रमाणात. काही सुकामेवा उष्ण प्रकृतीचा मानला जातो, त्यामुळे त्याचे अतिसेवन केल्यास उष्णता वाढू शकते. उन्हाळ्यात कोणते सुका मेवा खावे, जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
भिजवलेले बदाम उन्हाळ्यात खाणे उत्तम मानले जाते. यामध्ये प्रथिने, विटॅमीन, फायबर असते. ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळू शकतात.
Picture Credit: Pinterest
रात्रभर भिजवलेले मनुके उन्हाळ्यात खाल्ले जाऊ शकतात. हे ऊर्जा देण्यासोबत पचन चांगले ठेवण्यास मदत करते आणि शरीरामधील गरजेचे प्रथिने प्रदान करते.
Picture Credit: Pinterest
अक्रोडमध्ये ओमेगा 3 ॲसिड आणि ॲटिऑक्सीडेट असते. उन्हाळ्यात मर्यादित प्रमाणात हे खाल्ले जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
भिजवलेले अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन पचन चांगले ठेवण्यास मदत करते आणि उन्हाळ्यात हे मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
खजूर पोषक तत्वांनी समृद्ध असतात, पण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाणही जास्त असते. शरीरावर अतिरिक्त भार पडू नये म्हणून उन्हाळ्यात त्यांचे सेवन प्रमाणात करणे उत्तम.