नैसर्गिक सर्वच गोष्टी शुद्ध असतात. पण पावसाचे पडणारे पाणी तुम्ही डायरेक्ट पिऊ शकता की नाही?
Picture Credit: iStock
ढगातून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पाणी खूपच शुद्ध असते. पण धूळ, प्रदूषण आणि बॅक्टेरियामुळे हे नेहमी पिणे योग्य नाही
शहरी भागात पावसाच्या पाण्यात वायू प्रदूषण, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड मिक्स होते, त्यामुळे हे दूषित होऊ शकते
पावसाचे पाणी जमीन, छत आणि भांड्यांमध्ये साठल्यावर त्यात बॅक्टेरिया, व्हायरस निर्माण होतात आणि पोटाच्या समस्या होतात
पावसाचे पाणी साठविण्यासाठी स्वच्छ टाकी, भांड्यांचा उपयोग करावा. पहिले 10-15 मिनिट्स पाणी वाहू द्या
पावसाचे पाणी पिण्याआधी उकळून घ्या, जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया मरतील आणि त्रास होणार नाही
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील पावसाचे पाणी हे अधिक शुद्ध आढळते, त्यामुळे पिऊ शकता
दूषित पाणी पिण्याने पोटात जंत, उलटी, टायफॉईडसंबंधित आजार उद्भवू शकतात आणि प्रतिकारशक्ती कमी होते
पावसाचे शुद्ध पाणी हे खनिजमुक्त आणि शुद्ध असून त्वचा आणि केसांसाठी चांगले ठरते
पावसाचे पाणी सुरूवातील शुद्ध असते मात्र ते पिण्याआधी उकळून पिणे अधिक सुरक्षित आहे