शरीराला अन्नाबरोबरच किंवा त्याहुन जास्त गरज असते ती पाण्याची.
Picture Credit: Pinterest
असं म्हटलं जातं की पुरेसं पाणी शरीराला मिळालं की अनेक आजार दूर होतात.
बऱ्याचशा शारीरिक तक्रारी या पाणी प्यायल्याने जास्त बऱ्या होतात.
असं असलं तरी पाणी पिण्याची देखील योग्य वेळ असते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर पहिले एक ग्लास पाणी प्यायला पाहिजे.
सकाळी उठल्यावर काहीही खाण्यापूर्वी कोमट पाणी प्यावं. पचनक्रिया सुधारते.
घाईगडबडीत उभं राहून न पिता पाणी कायम बसून प्यावं.
जेवणापूर्वी आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणं आरोग्यदायी आहे.
तहान लागल्यावर घटाघटा पाणी न पित काही मिनिटांच्या अंतराने एक दोन घोट पाणी पिणं फायदेशीर आहे.