Published Oct 19, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
सनी देओलच्या बहुप्रदर्शित चित्रपटावर टाका एक नजर!
बॉलीवूड अभिनेता सनी देओलचे अनेक आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्याने आज नुकताच 'जाट' या आगामी सिनेमाचे पोस्टर रिलीज केले आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होणार आहे.
सनी देओलचा 'बॉर्डर २' हा चित्रपटदेखील पाइपलाइनमध्ये असून, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
.
सनी देओलचा 'लाहोर १९४७' चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अमीर खानदेखील दिसणार आहे.
.
सनी देओलच्या पाइपलाइनमध्ये 'बाप' चित्रपटाचा देखील समावेश आहे. ज्यामध्ये संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि मिथुन चक्रवर्ती दिसणार आहेत.
.
सनी देओल 'रामायण' चित्रपटामध्ये हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्यभूमीकेत आहे.
सनी देओलच्या पाइपलाइनमध्ये 'सूर्या' चित्रपट देखील आहे. ज्यामध्ये अभिनेता पोलीस अधिकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
सनी देओल 'सफर' या चित्रपटामध्येही दिसणार आहे. ज्यामध्ये सलमान खान कॅमिओ करणार आहे.