Published Dece 30, 2024
By Dipali Naphade
Pic Credit- Instagram
जॅकलिन नेहमीच आपल्या सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो पोझ देत पोस्ट करत असते आणि चाहतेही तिच्या लुकवर फिदा असतात
जॅकलिनच्या गुलाबी सॅटीन साडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिची ही साडी फारच रॉयल दिसत आहे
या सॅटीन साडीवर बारीक कलाकुसर असणारे हँडवर्क करण्यात आल्याने अधिक शोभा आली आहे
या साडीसह जॅकलिनने एका बाजूला केसांचा भांग पाडत समोर पफ काढला आहे आणि अर्धे केस खांद्यावर मोकळे सोडले आहेत
तसंच तिने सोडलेल्या केसांना संपूर्णतः वेव्ही लुक देत जुन्या जमान्याच्या हिरॉईन्सच्या लुकची झलकही दिली आहे
तिने या साडीसह विंग्ड आयलायनरची स्टाईल कॅरी केली असून तिचा हा लुक व्हायरल होताना दिसतोय
या सॅटिनच्या साडीसह जॅकलिनने मोत्याची मोठी कुडी कानात घातली असून तिचा हा लुक खूपच आकर्षक दिसतोय
.
जॅकलिनने फाऊंडेशन, काजळ, आयलायनर, पिंक आयशॅडो, हायलायटर आणि ग्लॉसी पिंक लिप्स करत मेकअप पूर्ण केलाय
.