उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक पदाचा राजीनामा दिला.
Picture Credit: Pixabay
धडखड यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
या राजीनामामुळे उपराष्ट्रपतीपद चर्चेत आले असून त्यांना किती पगार मिळतो? सुविधा कोणत्या मिळतात?
जगदीप धनखड यांनाही लाखो रुपये पगार मिळत होता. सरकारकडून अनेक सुविधा मिळतात.
उपराष्ट्रपतींना दरमहा सुमारे ४ लाख रुपये पगार मिळतो.
'संसद अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कायदा, १९५३' नुसार पगार दिला जातो.
लाखोंच्या पगाराव्यतिरिक्त, उपराष्ट्रपती पदासाठी अनेक सुविधा देखील दिल्या जातात. मोफत उपचार दिले जातात.
राहण्यासाठी बंगला, लँडलाइन कनेक्शन, दैनिक भत्ता, मोबाईल फोन सुविधा आणि संपूर्ण सुरक्षा दिल्या जातात.
जर उपराष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर त्यांच्या पगाराच्या ५० टक्के रक्कम त्यांना पेन्शन म्हणून दिली जाते.
याशिवाय त्यांना सुरक्षा, कर्मचारी, प्रवास आणि मोफत उपचार यासारख्या सुविधा मिळत राहतात.