Published August 30, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
जय शाह हे अनेक क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध नाव आहे, त्याच्या आयसीसी चेअरमन पदापर्यंतचा प्रवास कसा होता यावर एकदा नजर टाका.
शाह २०१५ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वित्त आणि विपणन समित्यांचे सदस्य बनले होते.
जय शाह यांना क्रिकेटचा स्क्रिप्ट रायटर म्हणून सोशल मीडियावर ओळखतात, शाह यांची २०२२ मध्ये बीसीसीआयचे सचिव म्हणून निवड करण्यात आली होती.
जय शाह यांची जेव्हा सचिवपदी निवड करण्यात आली होती तेव्हा ते पाच पदाधिकाऱ्यांपैकी सर्वात तरुण सचिव होते.
2022 मध्ये, जय शाह यांनी BCCI च्या रेकॉर्ड ब्रेकिंग इंडियन प्रीमियर लीग (IPL) मीडिया हक्क कराराचे नेतृत्व केले होते.
जानेवारी २०२१ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेने शाह यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. जानेवारी २०२४ मध्ये, शाह यांची पुन्हा निवड अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
फेब्रुवारी 2015 मध्ये शाह यांनी ऋषिता पटेल या त्यांच्या महाविद्यालयीन मैत्रिणीशी पारंपरिक गुजराती पद्धतीने लग्नबंधनात अडकले.
जय शाह हे अमित शाह यांचे पुत्र आहेत, अमित शाह हे भारताचे विद्यमान गृहमंत्री आहेत, त्याचबरोबर एक चतुर भाजपचे कार्यकर्ते देखील आहेत.
जय शाह हे ICC चे निर्वाचित अध्यक्ष आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 1 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल. ग्रेग बार्कले यांच्या जागी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.