Published August 22, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
भारताचे ८४ पॅरा खेळाडू यंदा पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा आणि रेकॉर्ड होल्डर भालाफेकपटू सुमित अंतीलकडून भारतीय प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
भारताचा पॅरा आर्चर शीतल देवी हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली आहे, तिला दोन्ही हात नसूनही तिचा निशाणा अचूक आहे.
.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये त्याने ७३.२९ मीरत भाला फेकून गोल्ड मेडल नावावर केले होते.
शीतल देवी ही २०२४ मध्ये पहिल्यांदाच पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे, तिची कामगिरी पाहून भारतीयांना तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
भारताची पॅरा तिरंदाज शीतल देवी हिला २०२३ मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्या होता.
भारताचा स्टार पॅरा भालाफेकपटू सुमित अंतीलला २०२१ मध्ये खेलरत्न पुरस्कार देण्यात आला तर २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
सुमित अंतील आणि भाग्यश्री जाधव हे दोघे ध्वजवाहक असणार आहेत, या दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा लवकरच श्रीगणेशा होणार आहे, पॅरालिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा २८ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.