झेंडू, मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा वापर करून देवघराभोवती सुंदर सजावट करा. फुलांच्या माळांनी कृष्णाच्या मूर्तीला आकर्षक लूक देता येईल.
Picture Credit: Pinterest
श्रीकृष्णाला मोरपिसे अत्यंत प्रिय मानली जातात. त्यामुळे सजावटीमध्ये मोरपिसांचा वापर केल्यास डेकोरेशनला खास कृष्णमय टच मिळतो.
Picture Credit: Pinterest
कृष्णाची ओळख असलेली बासरी सजावटीमध्ये नक्की वापरा. बासरीसोबत मोरपिसे आणि फुलांची सजावट केल्यास सुंदर थीम तयार करता येते.
Picture Credit: Pinterest
कृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणाऱ्या मटक्यांचा सजावटीमध्ये वापर करा. छोट्या मटक्यांना रंग, फुले आणि रिबनने सजवून देवघराच्या आसपास ठेवता येते.
Picture Credit: Pinterest
घरातील देवघर आणि कृष्णाच्या झोपाळ्याभोवती Fairy Lights लावा. मंद प्रकाशामुळे सजावटीला सुंदर आणि भक्तीमय वातावरण मिळेल.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
लाडक्या कान्हासाठी छोटासा झोपाळा सजवा. झोपाळ्याला फुलांच्या माळा, मोरपिसे आणि रंगीत कापडाने सजवल्यास तो अधिक आकर्षक दिसेल.
Picture Credit: Pinterest
दारासमोर किंवा देवघरासमोर कृष्णाच्या पावलांचे ठसे असलेली रांगोळी काढा. यामुळे जन्माष्टमीच्या सजावटीला पारंपरिक आणि सुंदर स्पर्श मिळतो.
Picture Credit: Pinterest
छोट्या बालकृष्णाच्या मूर्तीभोवती माखनाची मटकी, बासरी, मोरपिसे आणि फुलांची सजावट करून सुंदर कृष्णलीला थीम तयार करा.