जया एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करणे असते फायदेशीर

Life style

29 January, 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी पूजेसोबत दान करण्याला विशेष महत्त्व आहे. 

जया एकादशी 2026

 एकादशीची तिथीची सुरुवात बुधवार, 28 जानेवारी रोजी होणार आहे आणि तिथीची समाप्ती गुरुवार, 29 जानेवारी रोजी दुपारी होणार आहे. एकादशीचे व्रत गुरुवार, 29 जानेवारी रोजी पाळले जाणार आहे.

जया एकादशी शुभ मुहूर्त

या गोष्टींचे दान

एकादशीच्या  दिवशी दान केल्याने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. जया एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या 

वस्त्रांचे दान

गरीब आणि गरजूंना कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः पिवळे किंवा पांढऱ्या रंगांच्या कपड्यांचे दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.

तूप आणि तिळाचे दान

तूप आणि तीळ दान केल्याने आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळतो. धार्मिक श्रद्धा अशी आहे की तीळ दान केल्याने पापे दूर होण्यास मदत होते.

फळे आणि मिठाईचे दान

एकादशी व्रताच्या दिवशी फळे आणि मिठाईचे दान करणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा येतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

अन्नाचे दान

तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना, ब्राह्मणांना किंवा मंदिरांना पैसे दान करणे फायदेशीर आहे. यामुळे आर्थिक समस्या कमी होतात. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते.

दिवे आणि तेलाचे दान

जया एकादशीच्या दिवशी दिवा, तेल किंवा तूप दान केल्याने घरात शांती आणि आनंद टिकून राहते. तसेच नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो.

जया एकादशीचे महत्त्व

जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जया एकादशीचे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.