Published Sept 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/Pexel
डाएटमध्ये प्या ज्युस, होईल युरिक अॅसिड कमी
शरीरामध्ये युरिक अॅसिड वाढल्याने सांधेदुखीची समस्या वाढते. त्यामुळे वेळीच खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे
काही असे ज्युस आहेत, ज्यांचे नियमित सेवन केल्याने युरिक अॅसिड शरीरातून कमी होते
गाजराच्या ज्युसमध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटामिन ए, फायबर असे अनेक तत्व असून युरिक अॅसिड नियंत्रणात आणते
.
आरोग्याला ग्रीन टी मुळे अनेक फायदे मिळतात. इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी युरिक अॅसिड कमी करण्यास मदत होते
.
आल्याचा चहा पिण्याने शरीरातून युरिक अॅसिड लवकर कमी होण्यास फायदा होतो
डाळिंबाच्या रसात अँटीऑक्सिडंट्स गुण असून आजारांपासून तुमचे रक्षण होते आणि युरिक अॅसिड लवकर कमी होते
बीटचे ज्युस पिण्याने किडनी स्वच्छ होते आणि रक्ताची कमतरता दूर होऊन युरिक अॅसिडची समस्या संपुष्टात येते
काकडीचा रस पिण्याने किडनी साफ होते आणि रक्तातील युरिक अॅसिडची पातळी कमी होते
ज्युसचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही