कामिका एकादशीचे व्रत 21 जुलै रोजी पाळले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करुन काही वस्तूंचे दान केले जाते.
हिंदू धर्मामध्ये कामिका एकादशीच्या तिथीला विशेष महत्त्व आहे. विष्णूची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात.
कामिका एकादशीच्या दिवशी तांदूळ, गहू, डाळ आणि खिरीचे दान करावे. हे दान करणे खूप शुभ मानले जाते.
भगवान विष्णूंना पिवळा रंग आवडतो. यावेळी गरजूवंतांना पिवळ्या कपड्याचे दान करावे. यामुळे जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात.
कामिका एकादशीला तिळाचे दान करावे. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. दानधर्माचे पुण्य मिळते.
या दिवशी गरिबांना पैसे दान करा. धार्मिक मान्यतेनुसार हे दान केल्याने जीवनातील समस्या दूर होतात आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात.
कामिका एकादशीच्या दिवशी विष्णूंच्या मंदिरात जाऊन दिव्याचे दान करावे. त्यामुळे सर्व समस्या दूर होतात.
सकाळी लवकर उठून चांगले कपडे परिधान करा. त्यानंतर विष्णूंची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. त्यानंतर दिवा लावा. फूल, तुळस आणि चंदनाने त्याची पूजा करा
एकादशीच्या दिवशी सात्विक जेवण करा. यावेळी मांसाहार करु नका. खोट बोलणे, अहंकार करणे टाळा.