Published March 10, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
नुकतेच जयपूर 'आयफा २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये अवघी बॉलिवूड इंडस्ट्री उपस्थित होती.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननेही यावेळी शोमध्ये उपस्थिती लावली होती.
शोमधील करीनाच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.
करीनाने अवॉर्ड फंक्शनमध्ये, लाईट ब्लू कलरचा वेस्टर्न गाऊन वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या बेबोने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके फोटोशूट केले.
अभिनेत्रीने व्हाईट डायमंड ज्वेलरी वेअर करत आपली फॅशन केलीये.
अभिनेत्रीच्या फॅशनची जोरदार चर्चा होत असून तिच्या लूकचे नेटकरी कौतुक करीत आहेत.
करीनाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.