Published March 09, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने त्यातील कलाकारांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली आहे.
कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारे कलाकार सध्या आपल्या नव्या स्टाईलमुळे चर्चेत आले आहेत.
कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारी प्रियदर्शनी इंदलकर सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर मराठमोळी आणि लूकला साजेशी साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीने निळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.
अभिनेत्रीने, निळ्या साडीवर गडद लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
प्रियदर्शिनीने साडीतील फोटोशूटला ‘Six Yards Of Love..!!’ असे कॅप्शन दिले आहे.
प्रियदर्शिनी सध्या अद्वैत थिएटर्स निर्मित ‘विषामृत’ या नाटकात काम करत आहे.