Published Dev 12, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
खुशी कपूरने तिच्या BFF आलिया कश्यपच्या शेन ग्रेगोइरसोबतच्या लग्नासाठी कशीदा ड्रीम्स कलेक्शनमधील साडी नेसली होती
कशीदा हा फारसी शब्द आहे ज्याचा अर्थ भरतकाम आहे, जो काश्मीरमध्ये हाताने केलेल्या भरतकामाच्या संदर्भात वापरला जातो
खुशीने ही साडी अत्यंत पारंपरिक पद्धतीने नेसली असून ती खूपच रॉयल दिसत आहे. डिझाईनर तरूण तहलियानीने ही साडी डिझाइन केली
कोलंबियन पन्ना आणि बसरा मोती, सोन्याच्या बांगड्या आणि 18व्या शतकातील हैदराबादमधील चोकरसह प्राचीन झुमका सेट खुशीने घातला होता
या साडीसह खुशीने संपूर्ण एम्ब्रॉयडरी असणारा सिक्विन बॅकलेस ब्लाऊज परिधान केला होता, ज्याने साडीला अधिक उठाव आणला
या साडीसह खुशीने वेणीची हेअरस्टाईल निवडली होती आणि सर्व स्टाईल या अगदी पारंपरिक आणि आधुनिक मेळ घालून केल्या
.
खुशीने तरुण ताहिलियानीची बायझेंटियम हँडबॅग निवडली जी दिसायला खूपच रॉयल आणि हेव्ही टच असणारी आहे
.
ग्लॅमसाठी तिने विंग्ड आयलायनर, आयशॅडो, काजळ, मस्करा, हायलायटर आणि ग्लॉसी न्यूड शेड लिपस्टिक निवडली होती
.