२०३० पर्यंत किया भारतात १० नवीन मॉडेल्स घेऊन येणार आहे.
Picture Credit: Pinterest
त्यातील ८ मॉडेल्स EV किंवा हायब्रीड असतील, असे सांगण्यात आले होते.
Picture Credit: Pinterest
त्यानुसार, किया डबल धमाका घेऊन येत आहे. कियाने EV मार्केटमध्ये दमदार एँट्री केली आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनी पहिली किया सायरोस EV आणि नवीन सात सीटर सोरेन्टो हायब्रीड SUV लवकरच लाँच करणार आहे.
Picture Credit: Pinterest
किया सायरोस EV ऑगस्टमध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. तर या गाडीचे अनावरण जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest
तर सात-सीटर सोरेन्टो हायब्रीड सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest
किया सायरोस EV ही युरोपियन बाजारात विकल्या जाणाऱ्या ह्युंदाईच्या इन्स्टर EV च्या K1 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
Picture Credit: Pinterest
या गाडीमध्ये 42kWh किंवा 49kWh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. एका चार्जरमध्ये ही गाडी तब्बल ३६९ किलोमीटरपर्यंत धावू शकेल.
Picture Credit: Pinterest
कियाच्या लाइनअपमध्ये सोरेन्टोससा सेल्टॉसच्या वरचं स्थान दिलं जाईल.
Picture Credit: Pinterest
भारतीय मॉडेलमध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिनसोबत हायब्रीड टेक्नॉलॉजी मिळण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest
आंतरराष्ट्रीय बाजारात ही गाडी १.६ लिटर टर्बो-पेट्रोल हायब्रीड इंजिनसह उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
किया सायरोस EV ची किंमत १५ ते २० लाख असण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest
सोरेन्टो हायब्रीडची किंमत सुमारे ३० लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.
Picture Credit: Pinterest