www.navarashtra.com

Published 16, Dec, 2024

By Narayan Parab

महायुतीने 'या' 12 माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले

Pic Credit -   Social Media

माजी अर्थमंत्री, वनमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिले नाही.

सुधीर मुनगंटीवार 

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने माजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही.

छगन भुजबळ

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेत्यांपैकी एक माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना यावेळी मंत्रीपद मिळाले नाही.

दिलीप वळसे पाटील

माजी शालेय शिक्षण मंत्री, सावतंवाडी मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर यांना शिवसेना शिंदे गटाने मंत्रीपद दिले नाही.

दीपक केसरकर

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना यावेळी मंत्रीपद दिले नाही. त्यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

रविंद्र चव्हाण

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पक्षाने पुन्हा  मंत्रीपद दिले नाही.

तानाजी सावंत 

शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांना यावेळी मंत्रीपद मिळाले नाही. 

अब्दुल सत्तार 

अजित पवार गटाचे विदर्भातील प्रमुख नेते, माजी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आत्राम यांना यावेळी मंत्री होता आले नाही.

धर्मरावबाबा आत्राम

.

नंदुरबार जिल्ह्यात वर्चस्व असलेले माजी आदिवासी विकास मंत्री गावित यांची यावेळी भाजपकडून मंत्रीपदी वर्णी लागली नाही.

डॉ. विजयकुमार गावित

.

अजित पवार गटाने यावेळी माजी मदत आणि पुनर्वसन अनिल पाटील यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी दिली नाही. 

अनिल पाटील 

.

माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्रीपदी वर्णी लागली नाही. 

संजय बनसोडे

.

माजी कामगार मंत्री, भाजप नेते सुरेश खाडे यांना यावेळी पक्षाने मंत्रीपद दिले नाही.

सुरेश खाडे 

.

विधानसभा 2024 मध्ये निवडून आलेले सर्वात श्रीमंत आमदार