Published Jan 1, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
लोकांनी आपल्या अनोख्या परंपरा वर्षानुवर्षे जपल्या आहेत, आजही या परंपरांचं पालन केलं जातं.
वर्षानुवर्षे साजरे होत असलेल्या या परंपरा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत.
अशीच एक परंपरा म्हणजे थायलंडमधील मंकी बुफे फेस्टिव्हल.
थायलंडमध्ये एक सण आहे ज्यामध्ये लग्नाप्रमाणे माकडांसाठी बुफेचे आयोजन केले जाते.
बँकॉक (थायलंड) पासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर लोपबुरी नावाचे शहर आहे.
या थाई शहरात दरवर्षी एक सण साजरा केला जातो ज्याला 'मंकी बुफे फेस्टिव्हल' म्हणतात.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या पार्टीप्रमाणे बुफेमध्ये जेवणाची व्यवस्था केली जाते.
ही पार्टी मानवांसाठी नाही तर माकडांसाठी आहे.
उत्सवाचे आयोजन करणारे लोक माकडांसाठी ताजी फळे, सॅलड्स आणि मिठाई घेऊन येतात.
हा सण मोठ्या पार्टीसारखा साजरा करतात.
या उत्सवाची सुरुवात येथील एका स्थानिक व्यावसायिकाने केली असे लोकांचे मत आहे.