Published August 31, 2024
By Dipali Naphade
Pic Credit -iStock
मुलांना ठेवा दातांच्या समस्यांपासून दूर
लहान मुलं गोड पदार्थांपासून दूर राहू शकत नाहीत. मात्र यामुळे दातांना कीड लागून लवकर खराब होतात
जेव्हा गोड पदार्थ खाल्ले जातात तेव्हा ते दाताला चिकटून राहतात. या साखरेवर मग बॅक्टेरिया जमा होतात
.
साखरेमुळे दातांवर Acid जमा होते आणि मग इनेमल कमकुवत होते. यामुळेच दातांना कीड लागते
याशिवाय गोड पदार्थांमुळे दातांमध्ये तीव्र सणक येऊ लागते, यावर वेळीच लक्ष न दिल्यास दात खराब होतात
जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होऊन हिरड्यांमधून रक्ताची समस्या निर्माण होते आणि दात हलू लागतात
मिठाई, चॉकलेटसारखे पदार्थ दातांना अधिक नुकसान पोहचवतात. अशावेळी मुलांना गोड फळं द्यावीत
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लहान मुलांचे दात लगेच स्वच्छ करावे, ज्यामुळे दातांवर बॅक्टेरिया जमून कीड लागत नाही
गोड खाल्ल्यावर मुलांना चूळ भरायची सवय लावावी. तसंच पाणी सतत पिण्याची सवय चांगली असते