भजी नाही यंदाच्या पावसाळ्यात बनवा कुरकुरीत Onion Rings

Lifestyle

25 May, 2025

Author: Nupur Bhagat

मोठे कांदे  , कॉर्नफ्लोअर,बेकिंग पावडर, मीठ व मिरी, पूड, दूध , अंडं, ब्रेडक्रंब्स, तेल इ.

साहित्य

Picture Credit: iStock

कांद्याच्या जाडसर चकत्या कापून हळूवारपणे रिंग्ज वेगळ्या करा.

कांद्याच्या रिंग्ज कापा

मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, मीठ, मिरी पूड मिक्स करून त्यात अंडं व दूध घालून एकसंध बॅटर बनवा.

बॅटर तयार करा

प्रत्येक कांद्याची रिंग बॅटरमध्ये बुडवा आणि नीट कोट होऊ द्या.

रिंग्ज बुडवा

बॅटरमध्ये बुडवलेली रिंग ब्रेडक्रंब्समध्ये घोळवा, जेणेकरून ती कुरकुरीत तळली जाईल.

ब्रेडक्रंब्समध्ये घोळवा

सर्व तयार रिंग्ज फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवा, त्यामुळे कोटिंग चांगले बसते.

थंड करा

गरम तेलात रिंग्ज सोनेरी होईपर्यंत तळा आणि केचप किंवा गार्लिक डिपसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा