सकाळचा नाश्त्याला काही हटके ट्राय करायचं असेल तर तुम्ही सँडविच ढोकळा बनवू शकता
Picture Credit: iStock
बेसन, दही, आलं-मिरची पेस्ट, मीठ आणि पाणी घालून घट्टसर बॅटर तयार करा. १०–१५ मिनिटं झाकून ठेवा.
एक स्टीलची प्लेट तेल लावून ग्रीस करा. स्टीमर किंवा प्रेशर कुकर (शिट्टी न लावता) गरम करत ठेवा.
अर्ध्या बॅटरमध्ये अर्धा ENO घालून पटकन मिक्स करा व प्लेटमध्ये ओता. १० मिनिटं वाफवून घ्या.
पहिला थर तयार झाल्यावर त्यावर हिरवी चटणी पसरवा.
उरलेल्या बॅटरमध्ये ENO घालून मिसळा व चटणीच्या थरावर ओता. परत १०–१२ मिनिटं वाफवून घ्या.
तेल गरम करून त्यात मोहरी, तीळ, कढीपत्ता, मिरच्या घालून फोडणी करा व ढोकळ्यावर ओता.
थोडं थंड झाल्यावर चौकोनी तुकडे कापा व चटणी/सॉससह सर्व्ह करा.